मेळघाटातील चिखलदरा सह 6 तालुक्यातल्या उपासमारीची वेदना सोसणा-या 100 वर दिव्यांगजनांच्या परिवारांना मिळाला VIDA संघटनेकडुन दिलासा
(राहत्या गावात घरी पोहचते केले खाद्यसामुग्री किट्स)
कोरोना विषाणू महामारीला रोखण्यासाठी पाळण्यात येत असलेल्या राष्ट्रव्यापी टाळेबंदीमुळे (लॉकडाऊन) सामान्यजनांना हालअपेष्ठा सहन कराव्या लागत असून त्यांचेवर आर्थिक संकटाची कु-हाड कोसळली आहे. अश्यात दुर्लक्षित समाज घटक शारीरिक, मानसिक, दृष्टीदिव्यांग, वृद्धजन, हालचाल न करू शकणारे तसेच प्रतिकूल परिस्थितीशी झगडत निर्वाहासाठी स्वयंरोजगार करणाऱ्या दिव्यांगजनांचे अर्थाजन ठप्प झाल्याने त्यांना उपासमारीच्या गंभीर समस्येस तोंड द्यावे लागत आहे.
टाळेबंदीने प्रभावित हे समाजबांधव भुकेचे बळी ठरू नयेत म्हणून "व्हिजन इंटेग्रीटी डेव्हलपमेंट असोसिएशन (विडा)" या युवकांच्या संघटनेने त्यांचेवर लक्ष केंद्रित करीत त्यांची भूक भागविण्यासाठी "शेअर अँड स्माईल" या उपक्रमांतर्गत गहु आटा, तांदुळ, तूरदाळ, मटकी, बेसन, रवा, खाद्य तेल, मीठ, साखर, चहापत्ती, मिरची पावडर, हळद पावडर, बिस्कीट पुडा, कपडे धुण्याची साबण, अंघोळीची साबण आदी प्रत्येकी आठवडाभर पुरेल एवढ्या खाद्यसामुग्रीचा समावेश असलेल्या किट्स वितरणाचे कार्य हाती घेतले.
मेळघाटातील चिखलदरा सह अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापुर, चांदुर बाजार व मोर्शी या अमरावती जिल्ह्यातील सहा तालुक्यांमधील आडनदी, हिरदामल, बदनापूर, चिचाटी, बागलिंगा, कुलंगणा, रामटेक, कालापाणी, वस्तापुर, बिहाली, चांदपुर, टेब्रूसोंडा, एकझिरा, नागापूर, सोमवारखेडा, धामणगाव गढी, परतवाडा, अचलपूर, रासेगाव, बहिरम कारंजा, पथ्रोट, परसापूर, वडगाव, अंजनगाव सुर्जी, कोकर्डा, हयापुर, नालवाडा, इटकी, लेहगाव, शिवर, दर्यापुर, शिरजगाव बंड, चांदुर बाजार, येरला, खानापुर, उदखेड, मोर्शी या 38 गावांमध्ये राहणाऱ्या 105 दुर्बळ व दिव्यांग बांधवांच्या परिवारांना हुडकुन त्यांना खाद्यसामुग्री किट्सचे वितरण त्यांच्या राहत्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन सॅनिटाईझरने त्यांचे हात स्वच्छ करीत किटस् वितरीत करण्यात आल्या. हा उपक्रम चिखलदरा स्थित निवासी अंध विद्यालयाचे माजी प्राचार्य श्री. सूर्यकांत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली टाळे बंदीच्या नियमांचे पालन करीत दिनांक 10 एप्रिल ते 8 मे 2020 या दरम्यान दोन टप्यात राबविण्यात आला.
कोरोनाविरुद्ध लढत असतांना या समाजबांधवांना आधाराची गरज आहे, या आरोग्यविषयक आणीबाणीच्या काळात सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून उदार मनाने मदतीचा हात देण्याचे आवाहन विडा संघटनेचे अध्यक्ष प्रितेशकुमार सूर्यकांत वाघमारे यांनी करून सदर उपक्रमाला सफल बनविण्यासाठी मौलिक योगदान देणा-यांचे आभार मानले. उपक्रमाच्या यशस्वीतेकरिता सय्यद फरहान, अॅड. गजानन पाटील, कु. अमिता थुकरुल, धनंजय पाटील, अरविंद गावंडे, चरणदास पाटील, संतोष वाघमारे, सागर तायडे, स्वप्नील राऊत, रंजन पांढरे, निखिल तट्टे, अमित चौटियाल, नितीन जीवने, प्रतीक नान्नोरे, संजय गिरी, संतोष हिवाळे, संतोष धिकार, कुलदीप भोलाने, श्री. साई मोबाईल शॉपी (अमरावती), आशिष ठाकरे, निलेश मिसाळ, मनीष धोटे, सचिन शेरेकर, राहुल बुरघाटे, योगिता उंबरकर, गिरीश देशमुख, अंशुल भेंडे, हर्षाली हिवराळे, राम कु-हेकर यांच्यासह अनेक दानदात्यांकडुन आर्थिक वा वस्तु स्वरूपात मौलिक सहकार्य लाभले. जीवनावश्यक खाद्यसामुग्रीच्या किट्स तयार करणे, तालुक्यातील गावोगावी जाऊन लाभार्थ्याना हुडकणे व त्यांना खाद्यसामुग्रीच्या किट्स वितरित करण्याचे कार्य विडा संघटनेचे सर्व सदस्य अॅड. अंकिता पाथरे, प्राची वाघमारे, जया वाघमारे, उमेश तनपुरे, मो. साबीर, शेख नुरुद्दीन, अंकुश सोनोने यांनी केले.
Comments
Post a Comment