व्हिजन इंटेग्रीटी डेव्हलपमेंट असोसिएशन महाराष्ट्र (VIDA )
विडा ही
कुठल्याही राजकिय पक्षाशी निगडीत अथवा संबंधीत नाही. संघटनेमार्फत
पुरोगामी महापुरुषांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करते. संघटना
कुठल्याही जाती,धर्म , आणि पक्षाच्या विरोधात नसुन सर्वाना सोबत घेवुन
चालनारी संघटना आहे. विडा संघटना ही विद्यार्थी व जनतेच्या लोकहित वादी संघटन
आहे. लोकशाही मार्गाने एकत्र येवुन व कायद्याला अनुसरुन सर्वसामान्य
जनतेसाठी शैक्षणिक,व्यवसाय, शिबीरे,
कार्यशाळा, पथनाट्य, सभा, सम्मेलन, धरणा आंदोलन,मोर्चा व स्वराज्य
संघटनेच्या निवडणुकांत भाग घेणे आदी मार्गाने संघटना सतत कार्यरत राहणार
आहे..
तुमच्या न्याय व हक्कांसाठी सामील व्हा......
Join VIDA
: ध्येय व उद्दिष्टे -
1) विद्यार्थी मित्राना बेरोजगारीच्या समस्येतुन सोडवण्याकरिता "युवक
कल्याण, नोकरी भरती,स्वयंरोजगार मेळावे, स्पर्धा परीक्षा कार्यशाळा " घेवुन
विद्यार्थ्यांचा आर्थिक व सामाजीक विकास करने.
2) गावातील व शहरातील " सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतीक, तसेच क्रिडा" क्षेत्रातील समस्या जाणुन घेवुन त्या विरुद्ध आवाज उठवने.
3) जनतेचे नागरी अधिकार ( रस्ते,विज, शिक्षण, घरे) व जनतेचे नैतीक अधिकार सांगुन जनतेच्या हक्काची जाणिव करुण देणे.
4) शासकिय तथा शासणाच्या अधिकार क्षेत्रात येना-या कार्यालयातील
भ्रष्टाचार निर्मुलन करण्याकरिता माहीतीच्या अधिकारा नुसार प्रयत्न करने.व
जनतेला माहीती अधिकारांविषयी जन जागृती करणे.
5) समाजात अभ्यासु,प्रामाणिक,कार्यतत्पर असा सक्षम कार्यकर्ता व लोकप्रतिनीधी ची उभारणी करणे.
6) स्त्रियाना त्यांचे अधीकार व मुलभुत हक्कांची जाणिव करुन देणे.
7) स्त्रीयाना स्वरक्षणाचे प्रशिक्षण देणे व त्याना स्वयंरोजगार निर्मीती करीता प्रोत्साहन देणे.
8) भारतीय समाजातील विद्यार्थ्यामधे " राष्ट्रभक्तीची भावना" जागृत करुन त्याना समाज सेवेसाठी प्रोत्साहीत करणे.
Comments
Post a Comment