१९ फेब्रुवारी जागतिक शिवजन्मोत्सव नाशिक येथे उत्साहात साजरा

दि. १८ फेब्रुवारी २०१६ रोजी शिव जयंती च्या पूर्वसंध्येला सिन्नर तालुका शाखेच्या वतीने शिवजन्मोत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी चौक,सिन्नर येथे शिवपुर्वसंध्या आज  गुरुवार रोजी "संध्याकाळी ७:००" वा. मराठा महासंघाचे शिवशाहिर श्री.स्वप्नील डुंबरे, व सहकारी ‪#‎स्वर‬-शंभु# पोवाड्यांचा" कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला.


या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाशिक जिल्हा सरचिटणीस-योगेश वर्पे पाटील, नाशिक जिल्हा सम्पर्कप्रमुख प्रा.सचिन उगले, सिन्नर तालुकाध्यक्ष-अड. शिवराज नवले,शहराध्यक्ष-संतोष डावखर, राजेंद्र वारुंगसे,डॉ.मोगल, संतोष उगले,कुणाल हांडे,दिपक जाधव,नाना पाटोळे, रवीराजे चव्हाणके,निलेश भगत, योगेश काळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.  तसेच, युवक तालुकाध्यक्ष-अमित मुदबखे,रोशन काळे,संदीप खैरनार, इ.युवक पदाधिका-यांनी प्रचंड परिश्रम घेऊन शिवपूर्वसंध्या कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

सदर कार्यक्रमास पाहुणे म्हणून,आमदार राजाभाऊ वाजे,मविप्र संचालक कृष्णाजी भगत मा.नगराध्यक्ष-हेमंतनाना वाजे, नगराध्यक्षा अश्विनीताई देशमुख , माजी नगराध्यक्ष विठ्ठलराजे उगले, संगीतकार शुभम मूठाळ, उज्ज्वलाताई खालकर, प्रतिभाताई गारे , बाळासाहेब हांडे सर , बाळासाहेब उगले ,  आर के मुंगसे सर, विकास लाड आदी मान्यवर उपस्थित होते



" मातृदेवो भव. . . . . . 
 आईने केलेला माझा सत्कार
१९ फेब्रुवारी शिवजयंति निमित्त शाहिरी थाटात पोवाड्यांचा कार्यक्रम सादर करताना अखिल भारतीय मराठा महासंघ सिन्नरच्या पदाधिकार्यांनी माझ्या आई कडूनच सत्कार ठेवला, आमच्या दोघांसाठी हा क्षण अतिशय अविस्मरनिय राहील. . . अखिल भारतीय मराठा महासंघ सिन्नरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मी सदैव ऋणी राहील. . . . … . . . .
जय जिजाऊ जय शिवराय - शिवशाहीर स्वप्निलजी डुंबरे "

आईने केलेला माझा सत्कार - शिवशाहीर स्वप्निलजी डुंबरे 






दि. १९ फेब्रुवारी २०१६ रोजी रात्री ००.०१ वाजता शिवाजी चौक , सिन्नर  येथे सालाबादाप्रमाने यंदाही शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूँ वंदन करण्यात आले यावेळी विदा चे महासचिव विकास लाड, पोलिस निरीक्षक राजेंद्र शिन्गटे साहेब,सचिन उगले, विट्ठलराजे उगले , योगेश वर्पे तथा अनेक शिवभक्त यावेळी उपस्थित होते.




Comments